✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे
कास्प संस्थेच्या
गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अॅड. मंगेश नेने यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तर या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांची गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सामाजिक कार्यातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे आणि संस्थेच्या उपक्रमांमध्ये दिलेल्या सक्रिय योगदानामुळे ही निवड अपेक्षित मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवीन उर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेतील त्यांचा दीर्घ अनुभव आणि प्रशासन क्षेत्रातील दांडगा पाया लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच यावेळी भाग्यश्री डेंगळे यांची उपाध्यक्षपदी आणि निवेदिता दासगुप्ता यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. नव्या गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवडून आल्याने पेण तालुक्यातील सर्व स्तरातून अॅड. मंगेश नेने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.