Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जे एस डब्ल्यू (फेज थ्री )जन सुनावणी संदर्भात लावलेल्या विशेष ग्रामसभेतून उत्तर नसल्याने सरपंच सौ मानसी मंगेश पाटील यांचे पलायन .

Responsive Ad Here


✍🏻गडब / सुरेश म्हात्रे

पेण तालुक्यातील गडब (काराव ) ची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय गडब येथे आयोजित केली होती मात्र गणसंख्या अभावी सरपंच मानसी मंगेश पाटील व सदस्य ग्रामसेवक मच्छिंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दोनवेळा कोणत्याही ठरावाशिवाय सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली .
    

कंपनीसोबत असलेले हित संबंध जपणारी टोळी आज सरपंचांच्या बाजूने उभी राहिली याचा त्रास जन सुनावणीला मोठ्या संख्येने येऊन आपली हरकत लेखी स्वरूपात आपल्या शब्दांमध्ये नोंदवावी असे ग्रामसभेत सुज नागरीकांत तर्फे ठरवीले .
   सदर सभा गेल्या ६ ऑगस्ट रोजीघेण्याचे ठरले असताना ती सभा रदद करण्यात आली याचे उत्तरसौ सरपंच मानसी मंगेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे या संदर्भात कोणतेही उत्तर नसल्याचे निष्पन्न झाले .
   प्रदूषण जर थांबले नाही तर त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागेल . अजूनही वेळ गेलेली नाही आपण विरोध नोंदवू शकतो 22 ऑगस्ट रोजी १  वाजता धरमतर जेट्टी येथे सर्व सुज्ञान नागरिक जमून आपले मत नोंदवू शकतो .
   सदर सभेत विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र सुजान नागरीकांनी त्यांचा हा गोंधळ हानुन पाडला . सुजान नागरीकां तर्फे के . पी पाटील संजय चवरकर लक्ष्मण पाटील संदिप कडू सुरेश म्हात्रे संदिप म्हात्रे कुंदन म्हात्रे सुधीर पाटील विजय पाटील मिथुन पाटील अवंतिका म्हात्रे प्रगती चवरकर
तन्वी पाटील प्रगती पाटील कोठेकर आदी नागरीक उपस्थित होते .
     सदर ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात नागरीक उपस्थित होते .