गडब / अवंतिका म्हात्रे
रायगड जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्या संस्थांनी कायद्यानुसार नोंदणी केलेली नाही, त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करून घ्यावी. अन्यथा, अशा संस्थांवर कारवाई करण्यात येईल. असे अवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली .
दिव्यांग विभागाचे सचिव श्री. तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ७/११/२०२५ रोजी झालेल्या बैठकीत, दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश देण्यात आले.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, कलम ५१ आणि ५२ अन्वये दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी संस्थेची नौदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा लागेल.
विना नोंदणी कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ११ नुसार कारवाई केली जाईल.
थोडक्यात. रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संस्थांनी ३०.११.२०२५ पूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे आहे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली .