✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
दिनांक 9/11/2025 ते 11/11/205 दरम्यान झालेल्या मुंबई युनिव्हर्सिटी झोन 1 ही स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शहाजी राजे रोड विले पारले येथे संपन्न झाली . या शूटिंग स्पर्धेत 10 मिटर एअर पिस्टल मध्ये वीर वाजेकर ASC collage फुंडे उरण येथिल विद्यार्थी कुमार गौरव ठाकूर चिरनेर उरण याने 10 मिटर पिस्टल मध्ये सुवर्ण पदक पटकवल्या बद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गौरव सध्या सिद्धांत रायफल क्लब रायगड पनवेल येथिल असणाऱ्या इंडियन मॉडेल स्कूल अँड जुनिअर कॉलेज च्या शूटिंग रेंज वर प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज किशन खारके व अलंकार कोळी यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल वीर वाजेकर ASC कॉलेज फुंडे चे प्राचार्य व स्पोर्ट्स चे प्रशिक्षक यांनी पुढील ऑल इंडिया राष्ट्रीय युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेकारिता अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.