Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️वडखळ पोलीस ठाण्यातील बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप !

Responsive Ad Here

✍🏻गडब/ अवंतिका म्हात्रे

गणेशोत्सव काळात वडखळ व ग्रामीण विभागात कोणताही अनुचित प्रकार घडून न देण्याची आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. गावातील विसर्जन घाटावर रविवारी ९:०० वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहाने संपन्न झालेल्या बापांच्या विसर्जन सोहळ्यास वडखल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पी आय सांगळे पी आय शिंदे ए पी आय विजय म्हात्रे हवालदार ढेणे हवालदर देसाई यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, व त्यांचे कुटुंबीय पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते. 
       सदर बंदोबस्ता मुळे कर्मचाऱ्यांना रजा मिळत नसल्याने त्यांना आपल्या गावी जाता येत नाही त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशा पोलीस ठाण्यात गणेश उत्सव साजरा करण्यात येत असतो गणेश उत्सव काळातील आपले कर्तव्य बजावून गणपती बाप्पांची सेवा ड्युटीवर असतानाच करण्याची संधी कर्मचाऱ्यांना मिळत असते त्यानुसार पोलीस ठाण्यात लगत असलेल्या श्री. दत्त मंदिरात यंदा गणेश उत्सव साजरा करण्यात आला यावर्षी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती अनंत चतुर्दशीच्या विसर्जन करण्यात आल्यामुळे गणेशोत्सव बंदोबस्तातून मोकळे झालेल्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या  सुमारास सर्व कर्मचारीवर्ग आप्तेष्ट व वडखळकर नागरीकांनी फेटे परिधान करून आपल्या बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली
 सदर मिरवणुकीत वडखळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी पारंपारिक बँजोच्या तालावर ठेका धरत विसर्जत मिरवणुकीत 
मनसोक्तपने नाचत मनमुराद आनंद लुटताना दिसले .