✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील मुरलीधरनगर, पाटणोली येथे राहणारा संस्कार रामकेवल चौधरी (वय 11 वर्षे 9 महिने) हा अल्पवयीन मुलगा घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्याचे आवाहन पेण पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संस्कार रामकेवल चौधरी हा मुलगा 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकराच्या सुमारास आईकडून पैसे घेऊन दुकानातून जाऊन येतो असे सांगून घराबाहेर गेला. मात्र तो परत घरी आला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हरवलेल्या मुलाचे वर्णन असे आहे : उंची साधारण 3 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा, केस व डोळे काळे. अंगावर निळ्या रंगाचा हाफ शर्ट व पिवळ्या रंगाची टी-शर्ट, तसेच हिरव्या रंगाची चड्डी व पायात काळ्या रंगाचे चप्पल आहेत. बोलीभाषा हिंदी आहे.
या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ पेण पोलीस ठाणे (02143-252066) किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक ए. एस. साळवे यांनी केले आहे.