✍🏻गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेचे समजल्या जाणाऱ्या वडखळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी संतोष जाधव यांची तात्कालीन पोलीस निरीक्षक राष्ट्रपती पदक विजेते प्रसाद पांढरे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
श्री संतोष जाधव हे महाड येथे तसेच पनवेल, पाली या ठिकाणी काम केलेले असून त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे त्यांच्या या नियुक्ती बद्दल वडखळ आणि पेण परिसरातून तसेच पत्रकारांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या नविन नियुक्ती बद्दल गडब येथील रायगडची शानचे संपादक सुरेश म्हात्रे व राष्ट्रवादी कॉग्रेस पेण विधानसभा सचिव सौ अवंतिका म्हात्रे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या .