गडब / अवंतिका म्हात्रे
अंबरनाथ तालुक्यातील उसाटने बुईल या गावात पाच दिवसाचे गौरी गणपतीचे विसर्जन 'गणपती बाप्पा मोरया 'पुढल्या वर्षी लवकर या जय घोषात करण्यात आले. टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करीत फुलांची गुलालाची उधळण करीत बाप्पाला निरोप देण्यात आला . पाच दिवस भक्तीमय वातावरणात मनोभावाने मिरवणुक काढण्यात आली पारंपारिक भजनाचा आवाज सगळीकडे ऐकायला मिळत होता. अशा भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
गणपती बाप्पा विसर्जनावेळी नेताना बाप्पाचे मुख मागे असते जेणेकरून बाप्पाचा सदैव आर्शिवाद आपल्यावर रहावा हा यामागचा हेतु असतो गेली अनेकवर्ष ही परंपरा जपत गावांतील गावकरी मनोभावे बाप्पाचे विसर्जन करतात