Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⚪सर्व सण शांतता व सद्भावनेने साजरे करावेत – पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांचे प्रतिपादन⚫

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

गणेशोत्सव विसर्जन व ईद–ए–मिलाद ही दोन्ही सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यात आले.त्याच धरतीवर आगामी नवरात्रोत्सव, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे सण देखील शांतता व सद्भावनेने साजरे करावेत,अशी आवाहन वडखळ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी केले.
  वडखळ पोलिस ठाण्याअंतर्गत ग्रामस्थांची उत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात संतोष जाधव यांनी वरील वक्तव्य केले.दुर्गादेवी मूर्ती आगमन व निर्गमन विहित वेळेत व ठरलेल्या मार्गावरूनच करावेत,दुर्गादेवी मूर्ती सुरक्षेसाठी दिवसा व रात्री दोन–दोन स्वयंसेवक राहतील याची दक्षता घ्यावी, इलेक्ट्रिक कनेक्शन कायदेशीर असावे,दिवाबत्ती व सुरक्षा दक्षता घेऊन व्यवस्था करावी,इलेक्ट्रिक वायर उच्च दर्जाची असावी जेणे करून शॉर्ट सर्किट होणार नाही याची दक्षता घ्यावी,ध्वनिप्रदूषण होणार नाही याचीसुद्धा दक्षता घ्यावी, डिजे चा वापर करू नये,ध्वनिप्रदूषण मापक यंत्राद्वारे मापन होणार आहे या बाबत अवगत केले असावे,दर्शनासाठी येणारे भक्तांची पुरुष व महिला यांची स्वतंत्र रांग असावी,स्वयंसेवक नेमणूक करावे, त्यात महिला आणि मुलांचा समावेश असावे .त्वरीत संपर्कासाठी बिट अंमलदार,बिट अधिकारी, गोपनीय अंमलदार व पोस्ट प्रभारी यांचा मोबाईल नंबर घ्यावा.कायदेशील बाबींचे पालन करून सदर उत्सव आनंदाने साजरा करावेत असे आवाहन वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी मार्गदर्शन करताना केले.