गडब/सुरेश म्हात्रे
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती प्रतिवर्षी शिक्षकदिन म्हणून साजरी करण्यात येते. याच दिवसाचे औचित्य साधून खाडीपट्टयातील अप्पर तुडील केंद्राचे केंद्रप्रमुख तथा राजिप आदर्श शाळा सापे तर्फे तुडील शाळेचे पदवीधर शिक्षक वसंत सखाराम साळुंखे यांना नुकताच राजिपचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याआधी शिक्षक साळुंखे याना विविध प्रकारचे एकूण २८ पुरस्कार प्राप्त झाले असून राजिपकडून पुरस्कार जाहीर झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. साळुंखेंच्या पुरस्कारांची दखल घेत केंद्रासह खाडीपट्टयातील शिक्षकवृंदांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले आहे. अप्पर तुडील केंद्र सर्व शाळांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार अप्पर तुडील केंद्र शाळा येथे नुकताच करण्यात आला असून याप्रसंगी खूटील हायस्कुल मुख्याध्यापक राजेंद्र बनसोडे, शिक्षक हेमंत सारदळ, राम जंगम, मिलिंद
'केंद्र अप्पर तुडील केंद्राकडून अर्थात परिवारातील व्यक्तींकडून एवढा मोठा मान देऊन यथोचित सत्कार केला, मी माझे भाग्य समजतो हा सत्कार या जन्मात मी विसरू शकणार नाही आता राहिलेले दिवसात आणखी आत्मीयतापूर्वक काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली, मी भारावून गेलो आहे.' - वसंत साळुंखे, आदर्श शिक्षक, राजिप
सरदळ, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर हुंबे, अनिल खोपकर, दगड्डु कोळेकर, भुषण ढगे, संदीप पवार, अनिल मदने, सुरेश तेवढे, संतोष सूर्यवंशी, मुख्याध्यापिका प्रज्ञा धोत्रे, शितल मकर, रंजिता खोब्रागडे, आरती कुरघोडे, ज्योती सूर्यवंशी, वर्षा पवार आदी उपस्थित होते.
यादरम्यान प्रज्ञा धोत्रे, हेमंत सरदल, राम जंगम, प्रदीप शिंदे, अनिल खोपकर, जितेंद्र जाधव, मिलिंद सरदल यांनी साळुंखे यांच्या जीवनातील मनोगत व्यक्त करून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खोपकर यांनी केले व अनिल मदने यांनी सर्वांचे आभार मानले.