गडब/सुरेश म्हात्रे
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या नव्या व अत्याधुनिक नाट्यगृहाच्या माध्यमातून रोहा व परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना एक भक्कम व दर्जेदार व्यासपीठ मिळाले आहे. डॉ. देशमुख यांचे नाव असलेले हे सभागृह म्हणजे केवळ वास्तू नसून, विद्वत्ता, दूरदृष्टी आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे.
उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेल्या ह्या लोकार्पणाने रोहा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात नवे पर्व सुरू झाले असून, येत्या काळात हे नाट्यगृह विविध कलाविष्कारांना हक्काचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या नव्या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनानंतर प्रेक्षकांनी 'मोरूची मावशी' या नाट्यप्रयोगाचा आनंद घेतला. रंगभूमीवर हास्याचा झंझावात आणि सभागृहात रसिकांची टाळ्यांची दाद – अशा आनंदमय वातावरणात रोहेकरांनी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी मा. ना. कु. अदिती तटकरे, मा. श्री. अनिकेत तटकरे, ज्येष्ठ अभिनेते मा. श्री. भरत जाधव, मा. श्री. सयाजी शिंदे, मा. श्रीमती. वरदा सुनील तटकरे, मा. श्रीमती. वेदांती अनिकेत तटकरे, रायगड जिल्ह्यातील मान्यवर अधिकारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि रोहेचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.