✍🏻गडब/ सुरेश म्हात्रे
वडखळ, बोरी, शिर्की, वाशी, काराव, शिहू, हमरापूर या विभागांतील नागरिक वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे हैराण झाली होती, माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यलयावर धडक दिली.
संजय जांभळे यांनी मागणी केल्या १० मागण्यांना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना याबाबत लेखी पत्र दिले आहे
वारंवार बीजपुरवठा खंडित होणे, चुकीची बिले, धोकादायक विद्युत उपकरणे आणि इतर अनेक गंभीर समस्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर या समस्या अधिक गंभीर झाल्याने, रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. यावेळी संजय जांभळे, अशोक मोकल, के पी पाटील, के जी पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दररोज सरासरी ८ तास वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे दैनंदिन जीवना बरोबरच लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोठा फटका बसत
आहे. महावितरणचे कर्मचारी रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने वाढीव बिले पाठवत आहेत. स्मार्ट मीटरचा जबरदस्तीने बसवू नये. डीपीमधून तेल गळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. स्थिर आकार, इंधन आकार, वहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवणे. अश्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोर्चाचा पवित्रा घेतला असल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले.
यावेळी बडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी वीज वितरण कंपनी व नागरिक यामधील दुवा म्हणून काम करीत कायदा दिला नाही.अलिबाग हून आलेले शैलेश कुमार या अधिकाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद करत मागण्यांबाबत लेखी पत्र दिले.