✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
बॅकेच्या विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची व महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी बँक ऑफ इंडिया सर्वतोपरी प्रयत्न करणार असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी
रजनीश कर्नाटक यांनी केले.
बँक ऑफ इंडिया मार्फत पेण तालुक्यातील आमटेम येथे सामाजिक सुरक्षा योजना, रिकेवायसी, ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी
रजनीश कर्नाटक,
मुख्य महाप्रबंधक अशोक कुमार पाठक,मुख्य महाप्रबंधक, मुंबई परिक्षेत्र सुनील शर्मा ,विभागीय प्रमुख, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग दीपन्विता सहानी,उप विभागीय प्रमुख, बँक ऑफ इंडिया रायगड विभाग भरत सहाय,जिल्हा अग्रणी बँक रायगड व्यवस्थापक विजय कुलकर्णी,बँक ऑफ इंडिया गडब शाखा व्यवस्थापक कालिदास माने,साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर,
खारपाले ग्रामपंचायत सरपंच
कविता गावंड, आदिसह बॅकेचे अधिकारी, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
बँक ऑफ इंडिया चा व्यवहार 15.06 लाख करोड रुपये आहे 5300 पेक्षा ज्यादा शाखा आहेत पन्नास हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत 15 देशात बँकेच्या शाखा आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेचे 2. 80 लाख खातेदार आहेत. प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचे 7.10 लाख खातेदार आहेत.प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजना 3.52 लाख खातेदार, अटल पेन्शन योजना 66हजार खातेदार आहेत, बँकेमार्फत राज्यात अकरा ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चालवल्या जातात रायगड जिल्ह्यात बँकेच्या 47 शाखा आहेत बँकेमार्फत भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना राबविल्या जात आहेत या मधे
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ,
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,अटल पेन्शन योजना,
प्रधान मंत्री जन धन खाते,
रि केवायसी आदि योजानांची माहीती देण्यात आली
या योजनांचा लाभ जनतेने घ्यावा त्याचप्रमाणे महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी व महिलांना उद्योगासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल तसेच आदिवासींच्या जमिनीसाठी सहकार्य करण्यात येईल असे यावेळी रजनिश कर्नाटक यांनी सांगितले.
बँकेला व बचत गटांनाजोडण्याचे काम साकव संस्थेने केले आहे. बँकेत कर्मचारी कमी आहेत तेथे कर्मचारी नेमावेत, आदिवासींच्या जमिनीसाठी सहाय्य करावे तसेच बँकेच्या विविध योजना राबवण्यासाठी साकव तर्फे प्रयत्न करणार असल्याचे साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी सांगितले यावेळी बँकेमार्फत अपघाती विम्याचे वाटप त्यांच्या वारसांना करण्यात आले तर विशेष कामगिरी करणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला साकव संस्थेच्या महिलांनी बँक ऑफ इंडिया मुळे येथील महिलांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली या विषयावर पथनाट्य सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
वित्तीय समावेशन विभाग प्रमुख सुधिर गायकवाड यांनी केले
-------