Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मुंबई गोवा महामार्गावर ANPR सीसीटीव्ही कॅमेरांचे लोकार्पण व पुरस्कार वितरणकल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठानचा उपक्रम!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे
    मुंबई गोवा महामार्ग व रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसविले असून त्याचे उदघाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दादर पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राम्हणे, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश शरद ठाकूर यांच्या हस्ते झाले.
        सदर सीसीटीव्ही कॅमेरांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील
 हेल्प फाउंडेशन खोपोली, 
अहिल्या सामाजिक संस्था पेण, वाईल्डर कोलाड, संपर्क बालग्राम पोयनाड, व 
 सिस्केप संस्था महाड या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार करण्यात आला.
मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार देवदूत कल्पेश ठाकूर हे दिवस असो वा रात्र असो नेहमीच अपघातग्रस्तांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून मदत करत असतात तसेच आपत्कालीन परिस्थिती सुद्धा लोकसेवा करत असतात. आता गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती पोलिसांना मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर ANPR या अत्याधुनिक पद्धतीचे कॅमेरे बसविण्याचा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. असे उदगार प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी येथे सांगितले. 
         सामाजिक कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही मात्र कल्पेश केवळ सांमाजिक कार्याच नाही तर जीवन वाचवण्याचे महान कार्य करीत असल्याबद्दल त्याचे आभार मानावे तेव्हढे कमीच पडतील असे उदगार विभागीय पोलीस अधिकारी अधिकारी पजालिंदर नालकुल यांनी येथे सांगितले.
       एएनपीआर केमेरे मूळे अवेध वाहतूक व गुन्हेगारी करून पळून जाणाऱ्या वाहनावर आता नजर राहणार आहे. असे पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांनी यावेळी सांगितले.
        पोलिसांसाठी मदत करणारा कल्पेश ठाकूर खरंच पोलिसदूत आहे.  
अन्याय करणाऱ्या लोकांना न्याय मिळण्यासाठी जो पोलिसांना मदत करतो त्याचे आभार मानायलाच पाहिजे असे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी येथे संगितले.
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किरण कारंदीकर, गणेश थवई, व 
आभार दिक्षा पेरवी यांनी मानले.या कार्यक्रम प्रसंगी अनेक सामाजिक कार्यकर्ते,साई सहारा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.