✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
लंडन येथे ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमीक कन्व्हेन्शन’ च्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांना ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सत्कार सोहळ्यात बोलताना तटकरे म्हणाले की, हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशाची नोंद नसून मातृभूमीच्या योगदानाला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे.
खा. सुनिल तटकरे यांनी पुढे सांगितले की, “हा क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय आणि अभिमानास्पद टप्पा आहे. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आज जागतिक स्तरावर मान्यतेत रूपांतर झाले. या यशामागे कुटुंब, सहकारी, मार्गदर्शक आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे आणि भारताचे नाव जगभर उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे कार्यसम्राट खासदार सुनिल तटकरे यांना या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था तसेच रायगड जिल्ह्यासह पेण रोहा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि युवक वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे