Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

*♦️दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी कोळी ची उत्तुंग भरारी : नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघातून निवड*

Responsive Ad Here
   *✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे* 
      नेमबाजी हा एक क्रीडा प्रकार आहे . यामध्ये नेमबाजी साठी बंदूक, पिस्तूल  एअरगन यासारख्या शस्त्रांचा वापर केला जातो. त्यात अचूकता, वेग आणि नेमबाजी मधील कौशल्य तपासले जातात. रायफल ,एअर पिस्तूल, रायफल ५० मीटर तसेच शॉट  गन या प्रकारात ट्रॅप, डबल ट्रॅप, आणि स्कीट हे नेमबाजी चे प्रकार आहेत. अशा या नेमबाजी स्पर्धेत विविध अंतरावरील आणि विविध प्रकारच्या लक्ष्यांवर नेम धरून गोळी मारली जाते.
           उरण तालुक्यातील दिघोडे गावची सुवर्ण कन्या अवनी अलंकार कोळी सामान्य घरातील, पण असामान्य कामगिरी खेडेगावातील जन्म त्यामुळे मुलगी म्हणजे शिकवायची अन् तीचे लग्न करायचे हा समज,पण तीच्या हातात भांडी आणि कपडे न देता तीच्या आई वडीलांनी तीच्या हाती बंदूक दिली बंदुकीची मक्तेदारी पुरुषांची असा ग्रामीण भागातील लोकांचा भ्रम जे रोपटे आईच्या परसदारी रुजते आणि सासरच्या अंगणात वाढते, मोठे होते हा विचार मागे सारून तीला बंदुकीचे शिक्षण देणं हे समाज मनाला पटले नाही.पण अवनी चे वडील अलंकार कोळी माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य तसेच तेही  राष्ट्रीय नेमबाज व उत्तम शुटिंग कोच असल्याने त्यांनी आपल्या कन्येला या क्षेत्रात प्रोत्साहन दिले  आहे. त्यांनी तीच्या या क्षेत्रातील हुषारीचा, जिद्दीचा  उपयोग करून आज त्यांचे स्वप्न ती पुर्ण करीत आहे.
     .शॉट गन शुटिंग म्हणजे राजा महाराजांचा खेळ, महागडा खेळ ,लाखो किमतीची इम्पोर्टेड बंदूक/किट जवळ नसूनही  साधारण किट वापरून अनेक मेडल्स ची लयलूट करणारी हि भारतीय पहिली महिला आहे. आई कविता सामान्य गृहीणी,अवनीचा छोटा भाऊ अर्णव देखील आपल्या बहिणीचाच वसा चालवत आहे.तोही आंतरशालेय जिल्ह्यात प्रथम आणि मुंबई विभागीय स्पर्धा खेळला आहे. अशा या अवनीचे
शिक्षण इंडियन मॉडेल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज उलवे येथे झाले व पुढील शिक्षण वीर वाजेकर कॉलेज फुंडे उरण येथे ती एफ. वाय .बी. एस सी.मध्ये शिकत आहे.
अवनी ने सिध्दांत रायफल आणि पिस्तूल शुटिंग क्लब रायगड येथे किशन खारके राष्ट्रीय नेमबाज आणि महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी मुंबई च्या सेक्रेटरी कॉमनवेल्थ मेडलिस्ट श्रीमती शीला कानुगो यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १२ व्या वर्षी पिस्तूल शुटिंग ची सुरुवात केली. तीने राज्यपातळीवर, झोनल, प्री नॅशनल, आणि नॅशनल शुटिंग स्पर्धेमध्ये ती भारतामधून उरणमधील पहिली  विख्यात नेमबाज ठरण्याचा सन्मान  तीने मिळवला.अनेकदा जखमी होऊन विजयोत्सवातील मेडल स्वीकारताना जखमेतील रक्त तीच्या मेडल्सना लागले आहे असा तीचा झंझावाती खेळ आहे. 
     सन २०२३ मध्ये तीने डबल ट्रॅप शुटिंग चे शिक्षण छत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे येथे रालस्टोन कोयलो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील टिम मधून आपली  खेळातील चमक दाखवून अनेक मेडल्स मिळवले.  
    २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र च्या दोन टिममध्ये नेत्रदीपक कामगिरी करुन दोन सांघिक महिला व कनिष्ठ महिला असे दोन राष्ट्रीय गोल्ड मेडल मिळवले.
   अवनी ची गगनभरारी एवढ्या वरच थांबली नाही तर आता तीने आकाशाला गवसणी घातली आहे तीची निवड १४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ रोजी कझागिस्थान येथे होणाऱ्या  आशियाई शुटिंग चॅम्पियन शिप २०२५ ह्या स्पर्धेसाठी. उरण तालुक्यातील दिघोडे ची हि सुवर्ण कन्या अवनी अलंकार कोळी हिची डबल ट्रॅप शॉटगन ज्युनिअर वुमन ह्या नेमबाजी साठी भारतीय संघातर्फे निवड करण्यात आली आहे. रायगड व नवी मुंबई ची पहिली भारतीय संघात निवड झालेली नेमबाज आहे
   अवनी ने आतापर्यंत अनेक स्पर्धांमधून गोल्ड,सिल्व्हर, ब्राँझ  मेडल मिळविले आहेत.तीच्या या नेमबाजी खेळातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल तीचे कुटुंबिय, शाळा,व समाजातील विविध स्तरांतून तीच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल दिघोडे गावचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, तसेच मुसा मेहमूद काझी, साईम झुबेरखान देशमुख, अली रझा सय्यद,IMS उलवे च्या मुख्याध्यापिका गौरी शाह मॅडम या सर्वांचे मोलाचे योगदान आहे