✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता वेदांत, कुणाल प, गौरव व डॉ. आनंद यांची निवड
दिनांक 1 जुलै ते 7 जुलै 2025 रोजी देहाराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया ओपन शूटिंग नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सिद्धांत रायफल व पिस्टल शूटिंग क्लब रायगड चे नेमबाज यांनी महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व करत वेदांत खारके नेरे नवीन पनवेल ने 25 मिटर पिस्टल स्पोर्ट्स युथ मध्ये, 50 मिटर रायफल मध्ये ज्युनिअर मध्ये कुणाल पाटील जासई, सिनियर मेन मध्ये गौरव ठाकूर चिरनेर व तसेच मास्टर मेन मध्ये डॉ.आनंद कृष्णामूर्थी यांनी व्यक्तिगत सिल्वर मेडल मिळवत नेत्रदीपक कामगिरी करत 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता निवड झाली त्याबद्दल त्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे करीता क्लब चे सेक्रेटरी पिस्टल प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज किशन खारके, अलंकार कोळी राष्ट्रीय नेमबाज ब रायफल प्रशिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .