✍🏻 *गडब / अवंतिका म्हात्रे*
आज सुतारवाडी येथे रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांशी सखोल चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, पक्ष संघटन अधिक सक्षम करणे, तसेच कार्यकर्त्यांमधील संवाद व समन्वय वाढवणे या बाबत सर्वांगीण मार्गदर्शन करण्यात आले.
संघटनेच्या कार्यपद्धतीत अधिक परिणामकारकता यावी या हेतूने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्याही बैठकीत जाहीर करण्यात आल्या.
श्री. हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून तर श्री. सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
या दोन्ही नेत्यांनी पक्षासाठी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्हा संघटनेस निश्चितच होईल, असा ठाम विश्वास असल्याचे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे कार्यक्रमादरम्यान म्हणाले नव्याने नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
आपल्या नेतृत्वात रायगड जिल्हा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट व कार्यक्षम होईल, ही अपेक्षा आहे. या बैठकीस माजी आमदार श्री. अनिकेत तटकरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत .रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुधाकर घारे ह्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे ह्यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकरणीच्या सभेत केली यावेळी त्यांना शुभेच्छा देताना तसेच पेण तालुका पदाधिकारी निवडीचे पत्र देताना आमदार अनिकेत भाई तटकरे यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील महिला अध्यक्ष चैताली पाटील शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण जिल्हा महिला चिटणीस मिनाक्षी पाटील विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे सेवादल अध्यक्ष गंगाधर पाटील युवक अध्यक्ष विकास पाटील पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी पेण तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे तालुका उपाध्यक्ष महेंद्र वर्तक माजी नगरसेवक निवृत्ती पाटील अमित कुंभार राजू वाडकर जिते जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन पाटील तालुका चिटणीस अजित ठाकूर युवक उपाध्यक्ष सुमित म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते .