✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील वेगवेगळ्या मंदिरातून चोरी करून पसार झालेला सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पेण पोलीसांना यश आले असून पेण पोलीस ठाणे येथे गु.रजि.no.133/2025
BNS 305(D) हा गुन्हा दि.20/07/2025 रोजी 11.00 ते 19.00 वा.चे. द.साई मंदिर, कासार तलाव, पेण येथे घडला असून सदर गुन्ह्यामध्ये मंदिरातील 1 समई, 2 घंटा
चोरीस गेल्या असून दि.21/07/2025 रोजी दाखल आहे....
सदर गुन्ह्याचा तपास Sdpo पेण श्री. गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनी/ संदीप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकण शाखा, पेण यांनी तपास पथकाच्या 2 टीम तयार करून सुरू केला. पेण शहरातील सुमारे 15 ठिकाणचे cctv फुटेज तपासून अनोळखी आरोपीचे फुटेज प्राप्त केले. त्यामध्ये गुन्हा केल्यानंतर सदर आरोपी हा पेण s.t stand येथून s.t मध्ये बसून पनवेल बाजूकडे निघून गेला असल्याचे दिसले. म्हणून पेण व पनवेल येथे जाऊन आरोपीचा मागोवा घेतला असता तो रेल्वेने मुंबई येथे निघून गेला असल्याचे समजले. दरम्यान तपास टीमने मंदिर चोरी मधील रेकॉर्ड वरील आरोपी यांचा पूर्व इतिहासाची पडताळणी केली असता त्यामध्ये रेवदंडा पो .ठाणे कडील आरोपी नामे महेश नंदकुमार चायनाखवा रा. थेरोंडा, आगळ्याची वाडी, रेवदंडा, ता.अलिबाग हा दि.21/05/2025 रोजी अलिबाग जेल मधून सुटला असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपी चा फोटो प्राप्त करून पेण मधील cctv मध्ये मिळालेल्या फोटो सोबत मॅच केला असता दोन्ही फोटो मध्ये साम्य दिसून आले. म्हणून तपास पथकाने सदर आरोपीकडे लक्ष केंद्रित केले. सदर आरोपी हा अलिबाग जेल मधून बाहेर आल्या पासून तो त्याच्या राहते घरी राहत नसल्याचे समजले म्हणून तपास टीमने तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून आज दि. 25/07/2025 रोजी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेत असताना तो पनवेल येथून पेण बाजूकडे येत असल्याचे लक्षात आल्याने तपास टीमने खारपाडा चौकी येथे s.t बसेस तपासले असता सदर आरोपी नामे महेश नंदकुमार चायनाखवा हा बसमधे मिळून आला आहे. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पेण पोलिस ठाण्याकडे दाखल गुन्हाची कबुली दिली आहे. तसेच, पेण शहर हद्दीतील आणखी वेगवेगळ्या मंदिरातून छोटी मोठी समई व घंटा किरकोळ स्वरूपाची चोरी केली आहे.
तसेच वडखळ, दादर सागरी, रोहा व कोलाड पोलिस ठाणे हद्दितील मंदिरातिल समई व घंटा चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी यास अटक करून आज रोजी न्यायालयात हजर केले असता दि 29/07/25 पावेतो पोलीस कोठंडी रिमांड मिळाला असून पुढील तपास करीत आहोत....
सदरची कामगिरी सपोनी/निलेश राजपूत, Asi/ राजेश पाटील, HC/1424 सुशांत भोईर, HC/861 प्रकाश कोकरे, HC/1568 अजिंक्य म्हात्रे, HC/885 सचिन वस्कोटी, Pn/2319 अमोल म्हात्रे, Pc/1951 गोविंद तलवारे व Pc/1241 संदीप शिंगाडे यांनी केली आहे.