✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजित दादा पवार व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने पेण तालुक्यातील कोतवाल ह्यांच्या गुलाब फुल देऊन सत्कार व रेनकोट वाटप कार्यक्रम संपन्न
पेण तालुका महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाळविकास मंत्री आदरणीय नामदार आदिती ताई तटकरे आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांच्या संकल्पनेतून पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजित दादा पवार व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ह्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्था खारपाडा येथे खासदार आदरणीय सुनील तटकरे सभागृहात पेण तालुक्यातील कोतवाल ह्यांच्या गुलाब फुल व रेनकोट वाटप करून पेण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर ह्यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी कोतवाल संघटने कडून उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार व खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब ह्यांना वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देण्यात आल्या असून यावेळी कोतवाल संघटना ह्यांनी एका निवेदना मार्फत मागणी केली आहे की कोतवाल हा ग्रामहसूल सेवक असून आम्हांला चतुर्थ श्रेणी मध्ये समाविष्ट करणेसाठी आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब महिला व बाळविकास मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे ह्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार ह्यांचे कडे प्रश्न सोडविणेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके सेवादल जिल्हा अध्यक्ष गंगाधर पाटील शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे जिल्हा महिला चिटणीस मीनाक्षी पाटील तालुका महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील युवती शहर अध्यक्ष मुस्कान झटाम तालुका उपाध्यक्ष भरत महाडिक ओबीसी सेल अध्यक्ष भगवान पाटील कोळी सेल अध्यक्ष बिपीन पाटील पेण विधानसभा महिला चिटणीस ललिता ठाकूर पेण तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे तालुका चिटणीस अजित म्हात्रे झोतीरपाडा जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद तांडेल पाबळ जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रभाकर निगावाले तालुका उपाध्यक्ष तुकाराम गायकर वाहतूक सेल अध्यक्ष राजा मानाकावळे रावे पंचायत समिती अध्यक्ष नासिकेत मोकळ पेण तालुका युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील माजी उपसरपंच महादेव भगत संजय भोईर दत्ता ठाकूर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिते जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन पाटील पेण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर कै मोरेश्वर भगत शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष माजी सरपंच रश्मी भगत पेण तालुका युवक उपाध्यक्ष कैलास रुठे जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या अनिता भगत संस्था उपाध्यक्ष तथा खारपाडा महिला अध्यक्ष मालती म्हात्रे रामा म्हात्रे विध्यार्थी भगत विराज भगत ह्यांनी मेहनत घेतली