Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पेण येथे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न ; महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद*

Responsive Ad Here

 ।*✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे* 
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोकणचे भाग्यविधाते तसेच रायगड रत्नागिरी लोकसभा 32 मतदार संघाचे *खासदार सन्मा. सुनीलजी तटकरे साहेब,* यांच्या वाढदिवसानिमित्त पेण येथे गांधी मंदीर वाचनालय हॉल मध्ये पाककला स्पर्धा 2025 चे आयोजन केले होते ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाली . 
   
   सदर स्पर्धेचे उदघाटन तालुका अध्यक्ष दयानंदजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमादरम्यान विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकुर  पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकुर ॲड सेल अध्यक्ष मंगेश नेने शहर उपाध्यक्ष कैलास जाधव रफीक झराम युवक अध्यक्ष साजन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली .
     

महाराष्ट्राच्या *कॅबिनेट मंत्री तथा आमच्या लाडक्या महिला बाल कल्याण मंत्री यांच्या संकल्पनेतून मान.* *आदिती ताई तटकरे* लाडके  *मान. आमदार अनिकेत भाई तटकरे* यांच्या संकल्पनेतून आणि पेण शहर व तालुका यांच्या मार्गदर्शनातून यावर्षी देखील पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
   12/07/2025 रोजी शनिवारी
 दुपारी 3 वाजता 
  गांधी मंदिर वाचनालय पेण येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तरी स्पर्धेत १४० महिलांनी सहभाग नोंदवीला होता . सर्व पेण शहर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त माहिलांनी स्पर्धेत भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली . स्पर्धेच्यानियमांचे काटेकोर पालन करून महिला सहभागी झाल्या दिसले महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले
    
स्पर्धेचे नियम म्हणजे व्हेज किंवा नॉनव्हेज कोणताही एक पदार्थ बनवून आणणे असा होता . यास्पर्धेसाठी महिलांनी पौष्टीकतेवर भर देऊन व्हेज नॉनव्हेज स्वीट डीश अशा अनेक डीश बनवून कार्यक्रमात सहभाग नोंदवीला
 सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली . व सर्व स्पर्धकांनी वेळेवर हजर राहून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .  


♦️ बक्षिस♦️
प्रथम क्रमांक हर्षदा हर्षल चाचड रा प्रभु अळी यांना८००० रुपयांचे परितोषीक मिळाले .
द्वितीय क्रमांक मयुरी रकिश गोडीवले रा पेण यांना ५००० रुपयाचे परितोषीक मिळाला तर
तृतिय क्रमांक पद्मीबाई दत्ताराम पाटील रा कारावी यांना ३००० रुपयांचे परितोषीक मिळाले तर उत्तेजनार्थ आशा दिनेश म्हात्रे रा .नवेगाव यांना 2000 रूपयांचे परितोषीक तर प्रज्ञा प्रदिप वेदक रा पेण यांना 2000 रूपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले 
     

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून कुणाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमा मुंढे महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस
वसुधा पाटील - महिला विधानसभा अध्यक्ष
चैताली पाटील पेण तालुका महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण पेण शहर अध्यक्ष रायगड जिल्हा चिटणीस मिनाक्षी पाटील जिल्हा उपाध्यक्ष शालन सावंत विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे युवती अध्यक्ष मुस्कान झटाम उपाध्यक्ष जयश्री पाटील सुनीता घरत आघाडी युवती तन्वी हजारे तृप्ती म्हात्रे दुर्गा ठाकुर अर्पिता कुंभार रोहीणी शर्मिला भगत रश्मी भगत शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला .