✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
वडखळ पोलीस ठाणे अंतर्गत आज 26 जून जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिना निमित्त पोस्टे हद्दीतील शाळा, कॉलेज,आश्रम शाळांना, भेट देऊन तेथील विध्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवना पासून दुर रहावे, अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम काय आहेत ह्याबाबत माहिती देऊन जागृती निर्माण केली.
सर्व विध्यार्थ्यानी अंमली पदार्थ सेवन करणार नाही ह्याबद्दल सामूहिक शपथ घेतली आहे.
रान पाखरे आश्रम शाळा वरप येथील विध्यार्थ्यांची अंमली पदार्थ सेवनाचे गंभीर परिणाम बाबत निबंध स्पर्धा घेतली त्यातील पहिल्या 5 विध्यार्थ्यांना सन्मान पुर्वक प्रोत्साहानात्मक बक्षीस देण्यात आले.
भेट दिलेल्या शाळा, कॉलेज, आश्रम शाळा
***************
1) जनता हायस्कुल व जुनियर कॉलेज गडब
2) रानपाखरे आश्रम शाळा वरप
3) जिल्हा परिषद शाळा आमटेम
4) जय किसान विद्या मंदिर व जुनियर कॉलेज
6) सागर शिक्षण मंडळ,AT पाटील शाळा वाशी
7) ब ग ठाकूर विद्यालय वाढाव
8) बाल विकास विद्यामंदिर वाढावं
***************
विध्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन
**************
1) अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम गंभीर आहेत.
2) संपूर्ण जीवन उध्वस्थ होते,कुटुंब आणि देशाची भावी पिढी कमकुवत होते ह्याचा सरळ सरळ फायदा शत्रू राष्ट्रास होतो.
3) अंमली पदार्थ सेवनाने व्यसनाधित होऊन गुन्हेगारीकडे वाटचाल होते वजीन गुंतागुंत वाढून उदासीनतेतून गुन्हेगारी कृत्य घडते
4) नसेच्या अधीन झाल्याने गुन्हेगारी कृत्यासाठी वापर होऊ शकतो
5) शिक्षणातून उज्वल भविष्य निर्माण करण्याचे स्वप्न अंमली पदार्थ सेवनामुळे नष्ट होते.
तत्यामुळे विध्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवनापासून अलिप्त राहून शिक्षनातून आपले उज्वल भविष्य निर्माण करावे ह्या बाबत वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.