Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

*आमली पदार्थ शरीराला घातक - पेण पोलीसांची रॅली काढून जन जागृती*

Responsive Ad Here
     ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
    पेण पोलीस ठाणे हद्दीत आज 26 जून रोजी अमली पदार्थ विरोधी दिनाचे ' अनुषंगाने  सकाळी 11:00 वा. पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांचे सोबत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली. तसेच पुढे पेण पोलीस ठाणे येथून रॅली काढण्यात आली 
        सदर रॅली पेण पोलीस ठाणे  येथून सुरू होवून ती - भगवानदास चौक - कवढाळ तळे - रा.का.पाटील चौक - राजू पोटे मार्ग - नगरपालीक नाका - डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौक - छ.शिवाजी महाराज चौक - पेण पोलीस ठाणे समाप्त अशी रॅली काढण्यात आली.
        सदर रॅली मध्ये 1) सार्वजनिक कॅालेज 
2) प्रव्हेट हायस्कुल 3) कन्या शाळा 4) भाऊ साहेब नेने विद्यालय असे एकूण 103 विद्यार्थी तसेच पेण पोलीस ठाणे कडील 5 अधिकारी पोनि संदीप बागुल ,सपोनि निलेश राजपुत , पोसई विक्रम नवरखेडे , पोसई संतोष चव्हाण , मपोसई शिल्पा वेगुर्लेकर व 15 अंमलदार ,शिक्षक,शांतता कमीटी सदस्य, पत्रकार संघ उपस्थित होते.