✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
दि . १६/०६/२०२५ रोजी पेण शहरातील म्हा त्रे हॉस्पीटल समोरील विजय चिकन सेंटर समोर इसम नामे शिवराम बाळाराम शेळके वय ६० वर्षे, (पुर्ण पत्ता माहीत नाही), हे बेशुध्द आवस्थेत आढळुन आल्याने त्यांस उपचाराकरीता पेण सिव्हील हॉस्पीटल येथे अॅम्ब्युलन्स मध्ये पाठविले असता, तेथील वैदयकिय अधिकारी यांनी त्यास अधिक उपचाराकरीता पुढे अलिबाग सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवून तेथे दुपारी १५:२० दाखल करून त्यांचावर तात्काळ उपचार चालू केले होते, परंतू उपचार चालू असतांना दि.१७/०६/२०२५ रोजी सकाळी ०८:४५ वाजता शिवराम बाळाराम शेळके वय ६० वर्षे, यांना मरण आल्याने सिव्हील हॉस्पीटल अलिबाग येथील वैदयकिय अधिकारी यांनी त्यास मयत घोषीत केले असता,
श्री. सुनिल साहेबराव जाधव, अलिबाग पोलीस ठाणे, यांनी त्याचे मरणा बाबतची खबर दिल्याने त्याचे मरणाबाबत चौकशी होण्याकरीता पेण पोलीस ठाण्यात अ.मृ.३२/२०२५भा. ना.सु.सं. कलम १९४ अन्वये दाखल आहे. मयत इसम नामे शिवराम बाळाराम शेळके वय ६०वर्षे, (पुर्ण पत्ता माहीत नाही), यांचे नातेवाईक यांचा शोध होण्याकरीता व मयत यांची ओळख पटण्याकरीता सदर अकस्मात मृत्युचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. गजानन टोम्पे व पेण पोलिस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक श्री. संदीप बागुल मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप करीत आहे.
पेण पोलीस ठाणे फोन नं-०२१४३ २५२०६६
तपासिक अधिकारी पो.उप निरीक्षक. श्री. घोलप (९३२५२४१४७५)
१) नाव शिवराम बाळाराम शेळके
२) वय अंदाजे ६० वर्षे,
३) उंची १६३ सेमी
४) अंगकाठी (सडपातळ,
५) वर्ण (निमगोरा
६) व्रण (कपाळावर जखम
७) केस काळे व पांढरे बारीक,
८) अंगात नेसुस (अंगात काळा राखडी टीशर्ट बरमुडा कमरेला काळा करदोडा गळयात तुळशीची माळ असे वर्णनाचा असलेला.