गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखळ येथील साई एकविरा चायनीज व जितेंद्र चायनीज सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात दारू पिऊन ग्राहक धिंगाणा घालत असतात या बाबत संबंधित पोलीस स्थानकात तक्रार देऊनही कोणती कारवाई केली जात नाही.
आज दुपारी ११:४५ मिनिटाने प्रस्तुत वार्ताहराने संबंधित चायनीज सेटला भेट दिली असता तेथे ग्राहक दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे पाहावयास मिळाले याबाबत प्रस्तुत
वार्ताहराने संबंधित दुकान मालक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हे माझे नातेवाईक आहेत.
परस्तुत वार्ताहरने वडखल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना याबाबत सागितलं अशाप्रकारे चायनीज सेंटर मध्ये दारू पीने कितपत योग्य आहे.