Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

विठ्ठल नामाच्या गजरात अवघी दुमदुमली रोहा नगरी**वरदायी कीर्तन अमृत महोत्सवात रोहेकर झाले मंत्र मुग्ध

Responsive Ad Here
    ✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे
    .रायगड जिल्ह्यातील रोहा नगरीत कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पा मध्ये तीन दिवस वरदायी कीर्तन अमृत महोत्सव गजर कीर्तनाचा २०२५ या आध्यात्मिक कार्यक्रमाला भक्तीचा महापूर प्राप्त झाला असून रोहा मध्ये जणू काही धाकटी पंढरीच अवतरली आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची रसाळ वाणी, गायनाचार्य यांचा सुमधुर आवाजाने तसेच, टाळ मृदुंगाच्या  गोड वाद्य कलेत सारेच नाहले. एवढेच नव्हे तर हरिपाठ कार्यक्रमात चक्क खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मा. आमदार अनिकेत भाई तटकरे व स्वतः वरदा सुनिल तटकरे यांनी हाती टाळ घेऊन विठुमाऊलीच्या गजरात तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे यांच्या पत्नी सौभाग्यवती वरदा तटकरे यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका वारकरी संप्रदाय यांच्यावतीने वरदाई कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आपली कीर्तन सेवा रुजू करत सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे . 
कार्यक्रमाला सोमवार पासून रोहा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जणू काही भक्तीचा महापूर उसळला होता .यावेळी प्रथम दिवशी नामवंत कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, दुसऱ्या दिवशी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या शब्दसुमनांनी कीर्तन रंगले त्यांना साथ देण्यासाठी गायनाचार्य ह.भ.प. नारायण महाराज खिल्लारी, रविंद्र मरवडे, वैभव खांडेकर, मृदुंगमणी ह.भ.प. विकास महाराज बेलुकर यांनी साऱ्यांना मंत्र मुग्ध केले. २० ते २२ एप्रिल या कालावधीत संपन्न होत असलेल्या धार्मिक तथा आध्यात्मिक वरदायी अमृत कीर्तन महोत्सव या कार्यक्रमाचे मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी उत्तम नियोजन केले होते . कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये, सर्वांना कीर्तनाचा लाभघेता यावा, यासाठी कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत होते. मा. आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी कीर्तनकारांची भोजनाची व्यवस्था उत्तम केली असून स्वतः लक्ष देत कार्यक्रम उत्तमारीत्या पार पाडला. 
    या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे व जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष देशमुख व असंख्य कार्यकर्त्यांसह तालुक्यातील वारकरी संप्रदाय मंडळींनी आणि रोहेकरांनी सहभागी होऊन हरिपाठ व कीर्तनाचा लाभ घेतला तसेच या प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुगमणी यांचा या अमृत कीर्तन महोत्सव कार्यक्रमात तटकरे परिवांच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा भव्य दिव्य आणि देखणा असा हा कार्यक्रम हजारोंच्या संख्येने श्रोते गण यांच्या उपस्थित भक्तीच्या ओघात संप्रदाय मंडळी व रोहा तालुक्यातील तमाम नागरिक भक्ती सागरात तल्लीन होत असल्याचे पाहायला मिळाले.