नवीन वर्षाचा संकल्प हाती घेऊ, व आपले पेण वाहतुक समस्या मुक्त करण्याची जबाबदारी आपणच घेऊ या सकल्पनेचा अवलंब करून पेण कर सज्ज होऊ .
सध्या नाविन वर्षाची लगबग सगळीकडे सुरू असताना पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी नविन वर्षाच्या सुरुवातीलाच नवनवीन संकल्प आखल्याचे दिसते . त्यामध्ये माझ पेण माझी जबाबदारी या सकल्पनेतून मुख्यतः पेण परिसरात भेडसावणारी वाहतुक समस्या त्या वाहतुक समस्येवर कोणत्या प्रकारे नियंत्रण करता येईल यावर मुख्यतः भर देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक बागुल यांनी बोलताना सांगितले त्याचप्रमाणे पेण शहर हे गणपतीचे माहेरघर समजले जाते त्यामुळे येतील वर्दळ पाहता वाहतुक नियंत्रीत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगीतले . तसेच पेन शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसते पण रस्ते मात्र तेवढेच असल्याचे दिसते त्यामुळे वाहतुक समस्या मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसते त्यामध्ये जुना पेट्रोलपंप ते चावडी नाका येथे असणारे हॉकर्स येथे रस्त्यालगत लावल्या जाणाऱ्या भाजी तसेच इतर खाद्य पदार्थांच्या गाड्या आहेत त्या त्यांनी नेमलेल्या जागेवर लावाव्यात जेणेकरून वाहतुकदारांना कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी . तसेचे ऑटो आणि इको व्हॅन्स काळी पिवळी प्रवासी वाहतुक गाडी चालकांनी आपली गाडी इतरत्र पार्क न करता आपल्या नेमलेल्या जागी पार्क करावी जेनेकरून प्रवाशांना अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतल्यास वाहतुक सुरळीत राहण्यास मदत होईल
पेण शहरात मोठे व्यापारी वर्ग आहेत मोठमोठी दुकाने आहेत त्यांनी आपल्या मालाची ने आण करण्याची वेळ सकाळी किंवा रात्री १० नंतर ठेवल्यास बाजारपेठेतील वाहतुक नियंत्रणात येईल तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या पार्क व्यवस्थित रीत्या केल्यास बाजारपेठेत ट्रॉफीकची संभवणा कमी होईल अशा प्रकारची दक्षता सर्व व्यापारी वर्गाने घेऊन पेण पोलीसांना सहकार्य करण्याचे अवाहन केले जात आहे तसेच पेण परिसरात पार्क केल्या जाणाऱ्या रस्त्या लगतच्या चारचाकी वाहन चालकांनी आपल्या जबाबदारी चे व्यवस्थीत पालन करन पोलीसांना सहकार्य करावे या चार घटकांचा अवलंब सर्व पेण वासियांनी अवलंबला तर निश्चितच सर्व पेण वासीयांनी आपआपली जबाबदारी पाळली तर नक्कीच पेण परिसर वर्दळयुक्त होईल अशा प्रकारे सर्व पेण वासीयांनी पेण पोलीसां सोबत या संकल्पनेचे पाळन करावे असे आवाहन पेण पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .