गडब/सुरेश म्हात्रे
🟦 रायगड व परिसरातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या संकल्प
९१ या शैक्षणिक वर्षात दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा १२ जानेवारी रोजी वर्गमित्र नितीन पाटील यांच्या निवास स्तानी आयोजित केला असल्याचे ,संकल्प ९१ चे हितचिंतक सुरेश.प.म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
दर वर्षी प्रमाणे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संकल्प ९१ चा स्नेहसंमेलन मेळावा काळंबादेवीच्या मंदिरात आयोजित केला आहे.सदर मेळाव्यात फनी गेम्स वकृत्व स्पर्धा,निबंध. स्पर्धा ,विविध चुटकुले यांचे आयोजन केले आहे.सदर मेळाव्यात विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प ९१ चे सर्व सदस्य वसंत साळुंके ,सुरेश म्हात्रे,नितीन पाटील,वसंत म्हात्रे,महेश पाटील,किशोर कोठेकर हे सभासत तयारीला लागले आहेत.