Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

रायगड शान

Responsive Ad Here
यामध्ये अवैध जुगार व्यवहार चालविणारे कुणाल दत्तात्रेय सुर्वे (वय ३८ वर्षे, रा. मुरुड), राजेश मोतीलाल निशाद (वय ३० वर्षे, रा. अलिबाग) आणि शिल्पेश पोवले (रा. मु. अलिबाग) या तिघांविरुद्ध जुगार अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून दोन संगणक व रोख रक्कम असा एकूण ३८ हजार ५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई रसायनी येथे करण्यात आली. मातोश्री बिल्डींग, मोहपाडा वासांबे गाव याठिकाणी अवैध ऑनलाईन जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी सतिश लक्ष्मण शेजुळ (वय २९ वर्षे, रा. रसायनी), श्रीकांत पांगत (रा. रसायनी) आणि शिल्पेश

पोवले (रा. मु. अलिबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ३ संगणक व रोख रक्कम असा एकूण ४५ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, सचिन शेलार, परेश म्हात्रे, विकास खैरनार, भाग्यश्री पाटील, महीला पोलीस अंमलदार अस्मिता म्हात्रे, रेखा म्हात्रे, अभियंता मोकल, झुलिता भोईर, तुषार कवळे, अक्षय जगताप सहभागी झाले होते.