गडब/सुरेश म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीच येथे बाटली फुटली या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ओमकार सुरेश भूकवार, विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राज रमन जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर यांनी पेण तालुक्यातील गडब येथील मितेश पाटील याची निघृण हत्या करीत त्याचा मित्र प्रथमेश पाटील यांच्यावर वार करीत जखमी केले होते.
या प्रकरणातील आरोपी यांना अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर साळे आणि त्याच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड
तासाच्या आत जेरबंद केले होते. आता या आरोपीची
रवानगी हि न्यायालयीन कोठडी मध्ये करण्यात आली
आहे. तरी या आरोपींवर लवकरात कठोर कारवाई
होवून मयत मितेश पाटील याला न्याय मिळावा या
मागणीसाठी गडब येथील ग्रामस्थांनी दिनांक 8
डिसेंबर 2024 रोजी रात्री साडे साहाच्या सुमारास
कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी गडब पंचक्रोशीतील नागरीक तसेच पेण तालुक्यातील नागरीक व मित्रमंडळी यांनी कॅन्डल मार्च साठी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला व त्याला श्रद्धांजली देऊन सदर आरोपीला फाशी होईपर्यंत जनमांदोलन करणार असल्याचे गडब वासियांनी तसेच उपस्थित पदाधिकारी व मित्रमंडळी यांनी सांगितले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ' पेण तालुक्यातील गडब येथील मयत मितेश पाटील व त्याचा जखमी मित्र प्रथमेश पाटील हे अलिबाग येथील वरसोली येथील विठोबाच्या यात्रेसाठी आले होते. यात्रेतून फिरून झाल्यानंतर ते बियर पिण्यासाठी अलिबाग बीच येथे गेले होते. तिथे बियर पिल्यानंतर बाटली ठेवतना ती फुटली आणि ओमकार भुकवार , विशाल विजयकुमार वंटे, प्रथमेश शेखर घोडेकर, राज रमन जयगडकर, प्रमोद किशन साठविलकर यांच्यात बाटली फुटल्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. आणि त्या वादातून मितेश पाटील याची हत्या तर प्रथमेश पाटील यांच्यावर वार करण्यात आले.
या मध्ये मयत मितेश पाटील यांच्यावर वाद करताना आरोपी ओमकार भूकवार यांच्या पोटाला त्याच्या साथीदार याच्याकडून चाकू लागून जखम झाली आहे. आरोपींपैकी ओमकार भूकवार याच्या पोटाला चाकू लागून जखम झाली असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे मयत मितेश पाटील याचा साथीदार प्रथमेश पाटील याने त्याला ओळखले असल्याने त्याच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपीची नावे सुद्धा पोलिसाना समजली. त्यामुळे त्यांनी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन काढून त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र सदर आरोपी यांना वाचविण्यासाठी पेण व अलिबाग येथे राज्यातील सत्तेतील काही राजकीय पदाधिकारी हे हस्तक्षेप करीत असल्याने चर्चा देखील जोरदार रंगू लागली आहे. गडब ग्रामस्थ आणि मयत मितेश पाटील यांचे मित्र मंडळी याचे म्हणणे आहे की, शुल्लक बाटली फुटली मात्र ती काही जाणीपूर्वक काही फोडली नव्हती. मात्र त्याच्यावरून या आरोपींनी मितेशची हत्या करावी यावरूनच आरोपी समाजासाठी मोठे धोक्याचे आहे. असा आरोपींना न्यायव्यवस्थेने कठोर कारवाई कारवाई करावी तसेच यातील प्रमुख आरोपी असणारे ओमकार भूकवार आणि विशाल वंटे यांच्यावर असलेल्या गुन्ह्याची माहिती घेता लक्षात येईल.