Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - गडबचे नवनिर्वाचीत उपसरपंच दिपक कोठेकर यांचे प्रतिपादन♦️

Responsive Ad Here
        ✍🏻गडब / सुरेश म्हात्रे

       पेण तालुक्यातील सर्वांत श्रीमंत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक कोठेकर यांनी सांगितले की गावातील बेरोजगार तरुणांना जेएसडब्ल्यू कंपनीत रोजगार मिळून देण्यासाठी जीवाचे राण करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचीत उपसरपंच दिपक कोठेकर यांनी गडब येथे ग्रामपंचायती च्या कार्यालयातील पटांगणात जनसमुदया समोर आपले मनोगत व्यक्त करताना केले ते पुढे म्हणाले की गावातील बेरोजगार तरुनांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार तसेच गावातील विकासाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवणार असल्याचे ते म्हणाले .
   
     ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणूका होतात त्यावेळी गावातील सुज्ञ नागरीक यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्येने तो उमेदवार निवडून देत असतो आणि तसा विश्वास सर्वांनी माझ्यावर दाखवून मला निवडून दिला आहे त्यांच्य या विश्वासाला तडा न जाऊ देता मी त्यांचा सर्वोतपरी विश्वास संपादन करून दाखवण्याचे प्रतिपादन त्यांनी सर्व जनसमुदया समोर ते म्हणाले
           यावेळी व्यासपीठावर गडब ग्रामपंचायतींच्या सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील मनोहर पाटील मनोहर म्हात्रे जगदिश कोठेकर दिनेश म्हात्रे परशुराम मोकल भाग्यश्री कडू सिता पाटील किर्ती म्हात्रे वैशाली म्हात्रे मुक्ता वाघमारे व संध्या म्हात्रे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह मान्यवर उपस्थित होते .कार्यक्र
    या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कोठेकर विष्णु कोठेकर एस वाय लांगी यांनी केले .
    सदर कार्यक्रमाला खारमाचेला गावातील मान्यवर मंडळींसह सदानंद ठाकुर विजय पाटील विश्वनाथ कोठेकर तुळशीदास कोठेकर कमळाकर पाटील दत्ताराम पाटील किशोर कोठेकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते