Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण पोलिसांनी गोमांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

Responsive Ad Here
     गडब / अवंतिका म्हात्रे*
    पेण पोलीसांनी गोमांस वाहतूक करणारी टोळी  जेरबंद केली असून सदर गुन्ह्याच्या तपासाबद्दल, सोमनाथ घार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक रायगड, यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन टोम्पे, व पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समद बेग तसेच गुन्हे प्रकटीकरणाचे अंमलदार या गुन्ह्याचा तपास करीत होते टेम्पो सदर गुन्ह्यात टेम्पो क्रमांक एम एच ०५/एफ जे १५११ मध्ये ६ लाख ९८हजार रुपये किंमतीचे ३४९० किलोग्राम वजनाचे गी वंशिय जनावराचे मांस मिळून आल्याने ते मा. वरिष्ठांच्या आदेशानव्ये नष्ट करण्यात आले तसेच 3 लाख रुपये किंमतीचा टेम्पो क्रमांक एम एच ०५/एफ जे १५११ जप्त करण्यात आला आहे. 

गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना सदर टेम्पोचे मालक साजिद नायक कुरेशी रा. रसूल बिल्डिंग, कुरेशी नगर, कुर्ला पूर्व मुंबई असे असल्याचे समजते गुन्ह्यातील आरोपी क्रमांक-१) अफसर
महबूब कुरेशी वय 39 वर्षे रा. रुम नं ५ कुरेशी नगर, कब्रस्तान रोड, कुर्ला पूर्व मुंबई, २) नजरुद्दीन निजामुद्दीन खान वय ४८ रा. कुर्ला पूर्व मुंबई ३) साजिद लायक कुरेशी वय ४३ रा. गुलाम रसूल चाळ कुर्ला यांची माहिती घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्यात ते सहभागी असल्याची खात्री झाली दि.१९ डिसेंबर २०२४ ला त्यांना अटक करण्यात आली असून २६ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. गुन्ह्यातील आणखीन आरोपीचे शोध घेण्याचे काम चालु आहे. सदर गुन्ह्याचा तपासामध्ये मा. पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशन मधील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई समद बेग व सहाय्यक फौजदार राजेश पाटील, पोह राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सुशांत भोईर, सचिन व्हसकोटी, पोना / अमोल म्हात्रे, पोशि/ गोविंद तलवारे हे तपास करीत आहेत.