✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे*
पनवेल तालुक्यातील श्री साई सेवा पदयात्री मंडळ नेरे यांच्यातर्फे आयोजीत श्री साई सेवा पदयात्री सोहळ्याचे प्रस्थान शनिवार १४ डिसेंबर २०२४ ते २र डिसेंबर २०२४ पर्यंत शिर्डी येथे पायी रवाना झाली .
सालाबाद प्रमाणे श्री साई मंदीर नेरे येथू ढोल ताशांच्या गजरात पालखीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान करण्यात आले . सदर पालखी सोहळ्याचे हे १० वे वर्ष होते . सदर पालखी सोहळ्यासाठी प्रतिष्ठीत नामवंत व देणगीदार , हितचिंतक भक्तांनी आपली हजेरी लावली .

पालखी सोहळ्याचे अध्यक्ष तथा नेरे गावचे उदयोजक अनिल पाटील हे सोहळ्याचे प्रमुख नियोजक आहेत . त्यांच्या विशेष देखरेखीखाली पालखीचे नियोजन केले जाते व उपाध्यक्ष संदिप म्हात्रे सचिव मयुर पाटील उपसचिव अविनाश पाटील हे साईभक्त विशेष मेहनत घेताना दिसतात .

या पालखी सोहळ्यात २०० हून अधिक सभासह भाग घेतात सदर सोहळा सालाबाद प्रमाणे मोठ्या थाटामाटात संपन्न होतो . या पायी वारीसाठी अनेक अन्नदाते आपल्या भक्तांचे नियोजन करताना दिसतात या पालखी सोहळ्यात नेरे गावापासून आदई विहिघर गावातील साईभक्त सुद्धा विशेष देणगीदार आसल्याचे समजते . यापालखी सोहळ्यासाठी प्रतिषठीत लोकांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभते त्यात विहिघर गावचे माजी जि . प सदस्य विलास फडके यांचेही पदयात्रा मंडळाना मोलाचे सहकार्य असल्याचे समजते तसेच अध्यक्ष , उपाध्यक्ष, सचिव आणि साईमंडळ विशेष मेहनत घेताना दिसतात .

साई पालखी २१ डिसेंबर रोजी शिर्डी येथे पोहचता क्षणी मोठ्या थाटामाटात साईंची पालखी मंदिरात वाजत गाजत प्रस्थाथ करून साईचे दर्शन घेऊन पालखीची सांगता केली जाते . सदर पालखी सोहळ्यासाठी गावातील साईभक्त अनिल पाटील संदिप म्हात्रे वासुदेव गवते श्रीकांत गवते अविनाश पाटील मयुर पाटील राजा पाटील सुबोध पांचाळ अनिल फडके मंथन पाटील मयुर पाटील दिपेश गवते अजित गवते विवेक गवते संतोष पांचाळ तसेच सरपंच उपसरपंच सदस्य गावातील अनेक साईभक्तांचे मोलाचे सहकार्य असल्याचे दिसते .