Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

अल्पसंख्याक विकास आमदार अनिकेत तटकरे यांचे प्रतिपादन योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शैक्षणिक कर्ज, व्यवसाय कर्ज इत्यादी लोकोपयोगी योजना सुरू आहेत. खासदार सुनील तटकरे व महिला मंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात पहिल्यांदा माहिती शिबिर होत आहे. या महामंडळाच्या योजना सर्वदूर व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण प्रयत्नशिल असून विद्यमान सरकार सर्व धर्मीय व जातीय लोकांना सोबत घेऊन काम करत असल्याचे प्रतिपादन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.रोहा अंजुमन उर्दू हायस्कूल येथे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातर्फे विविध योजना विषयी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, नायब तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, शफी पानसरे, अहमद दर्जी, इम्तियाज दर्जी, फारूक सवाल, लियाकत सवाल, मुबीन कर्जिकर, समीर दर्जी, मजीद पठाण, नविद चोगले, रुपेश मोरे, प्रशांत कदम, सार्थक डोळकर, तलाठी विशाल चोरगे आदी मान्यवर महिला, विद्यार्थी शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मदरशांच्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी निधी
अधिक माहिती देत असताना आमदार तटकरे म्हणाले की, मुस्लिम समाजातील विद्याथ्यर्थ्यांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पूर्वी शासनाकडून १० लाख निधीची मिळत असे, मात्र आताच्या महायुती सरकारने यंदाच्या अर्थ संकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने येट अडीचशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वक्फ ऑफ बोर्डचे विभागीय कार्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी
लवकरच सुरू होणार असून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळाला आहे. असे असताना काही मंडळी सदर महामंडळ बंद झाल्याची अफवा पसरवून मुस्लिम समाजात या सरकारबदल गैरसमज पसरविण्याचा काम करत आहेत, मात्र मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला केंद्र व राज्य शासनाने भरघोस तरतूदची घोषणा करून अमलाबजावणी देखील केली आहे, असे आमदार अनिकेत तटकरे म्हणाले.