Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

गडब ग्रामपंचायतीच्या हददीत नाल्यात घाणीचे साम्राज्य ; लोकांना विविध आजारांची लागण

Responsive Ad Here
 गडब / सुरेश म्हात्रे

     पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये मुख्य नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून, या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत . याबाबत गावातील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी गावातील संबंधीत ग्रा पं च्या सरपंच सौ.मानसी पाटील यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता कोणतीही कारवाई केली जात नाही .
      गावातील नाल्यात ठीक - ठीकाणी कचऱ्याचे ढीग पडलेल असून त्या ढीगार्‍यांवर कुत्री आणि पक्षी सतत वावर करित आहेत . विविध पकारचे मच्छर चा सतत वावर असल्याने नागरीकांना सर्दी, खोकला, श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागतें . ग्रामपंचायतची असणारी घंटागाडीचा वापर कोणत्याही प्रकारे होत नाही सदर घंटागाडी ज्या जागेपर्यत जाऊ शकते त्या जागेपर्यंत ती नेल्यास थोड्या फार प्रमाणातील कचऱ्याची विल्हेवाट करता येईल . परेतू ग्रा पं या गोष्टीकड वारंवार सांगुन सुद्धा जाउबुजून दुर्लक्ष करित असल्याचे स्पष्ट होते . ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करत असल्याचे भासवले जाते मात्र तशाप्रकारचे दक्षता घ्यायला कोणीही तयार नाही . सुका व ओला कचरा नाल्यात टाकल्यास त्याच्या पासून लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते .
      पावसाळ्याच्या काळात अर्धवट नालेसफाई केली जाते .मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जाते नालेसफाईचा बील किती ? व कोठे खर्च झाला याबाबत कोणीही माहिती द्यायला तयार नाही . तसेच पत्रकार सुरेश म्हात्रे यांच्या खिडकी समोरील नाल्यात १ किलोमीटर अंतरावरून समाजकंटक लोक जानु बूजून कचरा टाकतात या संदर्भात ग्रा. पं कडे अनेकवेळा तोंडी तक्रारी केल्या आहेत परंतू ग्राम पंचायत दक्षता घ्यायला तयार नाही या गंभीर बाबीकडे ग्रा पं . ने लक्ष देऊन गावात जागोजागी डझबीन ठेवण्याची सोय करावी व नाल्यातील कचऱ्याची समस्या योग्यत्या पदधदतीने सोडवावी .