Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रो-कबड्डी लीगच्या पंकज मोहितेने झोपडपट्टीत घडवले आयुष्य!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

⬛प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या सिझन मध्ये पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू असलेला पंकज मोहिते हा मुंबईतील वडाळा येथील गणेश नगर या झोपडपट्टीतील राहणारा आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलेला पंकज सध्या प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जिथे तो राहत असे त्या झोपडपट्टी भागात त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि त्यात प्राविण्य मिळविले. पुणेरी पलटणची भिस्त सध्या पंकजवर असून त्याची टीम उपांत्य फेरीत पोहोचली आहे. आपल्या संघासाठी अधिकाधिक चषक जिंकून देण्याच्या त्याच्या उद्दिष्टाबरोबर त्याला त्याच्या आईने आणि कुटुंबाने पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचे आहे.
प्रो कबड्डी लीगचा सध्या दहावा सीझन सुरू असून यामध्ये पुणेरी पलटण या संघाकडून पंकज मोहीते हा खेळाडू खेळत आहे. त्याच्या खेळाची कबड्डीप्रेमींमध्ये चर्चा
आहे. मुंबईकर असलेला पंकज मोहिते हा वडाळा येथील गणेशनगर झोपडपट्टीत वाढलेला आहे.
वयाच्या १२ वर्षी नववीत असताना त्याचे वडील वारले. संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या आईवर आणि चार बहिणींपैकी सर्वात मोठ्या असलेल्या बहिणीवर आली. आईने घरकामासारखी छोटी-मोठी कामे केली तर बहिणीने कॉलेज करत ट्युशन वगैरे देत घराची जबाबदारी घेतली.
अतिशय खडतर परिस्थितीतून वर आलेल्या पंकजने आपले नाव क्रिडा जगतात मोठे केले आहे.