Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

'माझ्यावर टीका करण्याचा गीतेंना अधिकार नाही - खा. सुनील तटकरे

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

 ⬛राज्यात आणि केंद्रात एनडीए महायुतीच्या सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सामील झाल्यानंतर आमचा सेक्युलरझम संपला, अशी निवडणुकीच्या तोंडावर मताचा जोगवा मागण्यासाठी, जे भाषणाची सुरुवात करताना फक्त माझ्या तमाम हिंदु बंधू आणि भगिनी, अशी साद घालत बोलणारे माजी खासदार अनंत गीते यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहरातील जामिया मोहम्मदिया कोकण (मदरसा) येथील श्री-फेस इलेट्रिक ट्रान्सफार्मच्या उ‌द्घाटन सोहळा कार्यक्रमात व्यक्त केला. आगामी निवडणुकीत जर शिवसेनेचे अनंत गीतेंनी रायगड लोकसभा मतदारसंघात एकाच काम दाखवल्यास आम्ही त्यांना एक लाख रुपये बक्षीस देऊ असे खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे.
आमच्या धर्मनिरपेक्ष विचारावर प्रश्न निर्माण करणारे लोकांची दिशाभूल करीत आहेत हेच अनंत गीते सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन येथे बॅरिस्टर अंतुले साहेबांना हिरवा साप आणि पवार साहेबांवर कडवट बोलत होते. ते
आता माझ्यावर टीका करत आहेत. ते समजून घ्यायला हवे. खासदार तटकरे पुढे बोलताना बॅ. अंतुले साहेबांनी राज्यात आणि केंद्रात केलेले काम हे अजरामर आहे त्यांची बरोबरीची तुलना मी माझ्या बरोबर करणार नाही किंबहुना ती पाण्याच्या थेंबा इतकी होऊ शकत नाही, पण बॅ. अंतुले आणि आमचे काम करत असतानाचे सेक्युलरझम हे सारखेच असल्याचा आवर्जुन उल्लेख केला.