गडब / सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील नावाजल्या जाणाऱ्या वडखळ पोलीस निरीक्षक पदी प्रसाद दशरथ पांढरे यांची नियुक्ती झाली आहे .
नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला असून ,जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर आणि कर्तव्यनिष्ठ असतील असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले .
प्रसाद पांढरे यांनी यापुर्वी संपुर्ण महाराष्ट्रात काम केलेले असून, तेथे त्योची काम करण्याची पद्धत उल्लेखनीय आहे. त्यांनी देश विरोधक काम करणाऱ्यांनविरोधात मुंबई क्राईम ब्रांच येथे त्यांनी काम केले आहे . ते उच्च शिक्षीत असून गुन्हेगारांचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी वडखळ पोलीस निरीक्षक पदी त्यांची वरिष्ठ पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली आहे .
त्यांच्या या नियुक्ती बददल् पेण, वडखळ, आणि कासू विभागातून आनंदाचा वर्षाव होत आहे तसेच सदर
पोलीस निरीक्षकांन बद्दल पत्रकारांनी सुद्धा आशावाद व्यवत्त केला आहे . सदर पोलीस निरीक्षक हे सर्व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतील असे त्यांना पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले .