गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील वडखल भागात अलीकडे गुटखा विक्री
धंदा खुलेआम सुरू असून कोणत्याही प्रकारे
कारवाई गुटखा डिलर, दुकानदारावर होत नाही.
त्यातच संबंधित विभाग यंत्रणा अधिकारी
कानाडोळा करत असल्याने नाक्यापासून ते
गल्लीपर्यंत असलेल्या दुकानात, पान
टपऱ्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री केली
जाते. गुटखा विक्री बंदी कायदा असताना गुटखा
डिलर लपंडाव पद्धतीने गुटखा आणून गुटखा
विक्रीचा धंदा तेजीत करत आहे. या गुटख्यामध्ये
फेमस म्हणून " विमल " गुटख्याने उच्चांक
गाठला आहे. याच गुटख्यामुळे काही जणांना
कर्करोग सारखा जीव घेणे आजाराचा सामना
करावा लागला आहे, असे असताना एका
बाजूला शासन विविध योजनेच्या माध्यमातून
मदत करून त्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न
करत असते याचा आनद वाटतो तर दुसरीकडे
संबंधित विभाग अधिकारी गुटखा विक्रीवर
कारवाई करण्यासाठी असक्षम असल्याची खंत
वाटते. आम्हाला टपऱ्या टपऱ्यामध्ये, दुकाना-
दुकानात गुटख्याचे विविध प्रकार दिसतात, परंतु
संबंधित अधिकारी यांना का नाही दिसत ?
असा प्रश्न समोर उभा राहत आहे.गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गुटखा
विक्री कुठे-कुठे होत आहे अशा दुकानांची
पाहणी केली असता त्यानुसार गुटका विक्री
तेजीत सुरू असल्याचे निदर्शनास आले
आहे. याच गुटख्यामुळे शरीरावर होणारी हानी
कुटुंब-प्रपंच उध्वस्त करणारी महत्त्वपूर्ण बाब ही
चिंताजनक ठरत आहे. मध्यस्थी गुटखा डिलर
पकडला गेला परंतु गुटखाबंदी झालीच नाही
त्यामुळे हप्तेबाजी होते की काय ? अशी शंका
वाटू लागली आहे. पेण तालुक्यात वडखल भागात गुटखा हा येतो कुठून ? कोणत्या मार्गाने येतो ? कधी येतो
? कोणाकडे येतो ? याचा शोध लावला जात
नसल्यानेच गुटखा विक्री धंदा तेजीत सुरू आहे.
वडखल भागात. पोलीसच गुटखा विक्रेत्यांकडून हप्ता वसुली करत असतात.
गुटखा साठवण्याचा गोडाऊन नक्की कुठे आहे
? कोणत्या प्रकारचा गुटखा या गोडाऊन मध्ये
असेल ? हे टपऱ्या टपऱ्यांच्या दुकानात
गोपीनिय माहिती मिळवण्याच्या दरम्यान गुटखा
विक्रीवाल्याकडूनच कळून येईल. गुटखा विक्री
बंदीच्या नियमांचे व निर्बंधांचे उल्लंघन केले
जात असून शासनाचे वचक मात्र राहिले
नसल्याने येथे गुटखा धंदा तेजीत सुरू आहे.
यावर आळा घालण्यासाठी संबंधित विभाग
यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे अशीच
म्हणायची वेळ आज आली आहे.