Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

प्रसिद्ध बैलगाडी शर्यतीतील मोठ नाव असलेले गोल्डनमॅन, ‘पंढरी शेठ फडके’ यांचे निधन*

Responsive Ad Here


✍️गडब / अवंतिका म्हात्रे

     महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडी शर्यत शौकीन, गोल्डनमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले आहे. वडिलांच्या काळापासून १९८६ पासून बैलगाडा शर्यतीची आवड पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
बैलगाडी प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्द होते. जिथे बैलगाडी शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडीशर्यत पुन्हा सुरु व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास ४०-५० शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत.
     मूळचे पनवेल तालुक्यातील विहीघर गावचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडी शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. १९८६ सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.
     बैलगाडी शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. आज त्यांचं निधन झालं आहे.