Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

शासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीप्रश्न पेटलाखारेपाटातील ग्रामस्थांचे ९ दिवसांपासून उपोषण सुरू

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

⬛पाण्यासाठी खारेपाटातील तरुणाई डिसेंबर २०२३ से १४ डिसेंबर २०२३ रोजी ९ दिवस वाशी जगदंबा मोंदिर पटांगणावर उपोषणाला बसले होते, त्या दरम्यान, अधिवेशन चालू असल्याने शेकापचे चिटणीस आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. सुनिल शिंदे, आ. अनिकेत तटकरे यांनी खारेपाटातील उपोषणासंदर्भात प्रश्न उपस्थित करून सरकारने लक्ष खारपार पाणीप्रश्नाकडे बेपले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर रोजी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषणकत्यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते.
परंतु, दिलेला शब्द शासनाने पाळला नाही माणून अखेर शनिवार (दि.२४)
वाशी येथे जितेंद्र ठाकूर, अजित पाटील, हेमंत पाटील, अभिमन्यू महात्रे, स्वप्निल म्हात्रे आणि नंदा महात्रे आमरण उपोषणाला
बसले आहेत. दरम्यान, उपोषणकत्यांनी १४ डिसेबर २०१३ रोजी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा
प्रस्तावास एक महिन्यात मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तरी, खारेपाटातील जनतेला अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने ११ डिसेंबर २०२३ रोजी २५ डिसेंबर २०२३ पर्यंत चाशी येथील पाण्याची राकी भरून त्यातून पाणीपुरवठा
मुरू करण्याचे दिलेल्या लेखी आश्वामनाची पूर्तता करावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही योजना पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई व कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई करावी, निधी उपलब्ध असूनही प्रस्तावित योजना पूर्ण न करून मूलभूत गरज असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवून खारेपाटातील जनतेचा अमानुष छळ करणाऱ्या जबाबदार अधिकान्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने प्रलंबित योजना पूर्ण करण्याचे कालावधीचे प्रतिज्ञापत्र लिहून दयावे, या मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा उपोषणषल्यांनी दिला आहे.