🖊️गडब/सुरेश म्हात्रे
गडबमध्ये ओले काजूगर आणि विविध गावठी भाज्यांची आवक वाढली असून सकाळी काजूगर आणि भाज्या मोठ्या प्रमाणात मुख्य मार्केट जवळ विक्रीस येत आहेत. गोपाळवट येथून ओले टपोरे काजूगर ७०० रूपये ते ८०० रूपये किलो दराने उपलब्ध होत असले तरी वडखळ पेण तालुक्यातील मुचणे गावच्या आदिवासी महिला शेकडा १२० रूपये दराने ओले काजूगर विकताना दिसत आहेत.या महिला महिलांना मिळतोय रोजगार
महिलांना मिळतोय रोजगार
सुमारे ३५ किमी एस टी बसने प्रवास करून दररोज मुरूड मार्केटमध्ये येत असतात. मुरूड तालुक्यातील पोपटीच्या कडव्या वालाच्या शेंगा देखील सकाळ संध्याकाळी मार्केटमध्ये येत आहेत. यामुळे अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. पोकळा, वांगी, मेथी, काळाभोपळा, पालक, भेंडी, दुधीभोपळा, गावठी
कोथिंबीर, गावठी रताळी, पपई, वाल पापडी, घेवडा शेंगा, वालाच्या हिरव्यागार शेंगा, शेवग्याच्या शेंगा, कलिंगडे, गावठी वेलची केळी, पडवळ आदी गावठी भाज्या देखील गडब,वडखळ,करावी, डोलवी, नवेगाव,आदी गावांतून महिला मुबलक प्रमाणात विक्रीस
आणत आहेत.
शनिवार, रविवारी येणारे पर्यटक हिरव्यागार गावठी भाज्या घेण्यासाठी हमखास येतात. पंचक्रोशीतील लालभडक गोड चवीची कलिंगडे देखील मोठ्या प्रमाणांत विक्रीस येत आहेत. पेण तालुक्यातील वडखळ गावातील प्रसिद्ध आणि चविष्ट वांगी देखील सकाळी विक्रीस येत आहेत. प्रसिध्द पोपटी साठी लागणाऱ्या कडव्या हिरव्यागार वालाच्या शेंगा १०० रूपये किलोने मिळत आहेत.