गडब/सुरेश म्हात्रे
[~]राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत, मात्र अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही. सध्या अजित पवार यांना वेगवेगळी शिष्टमंडळे भेटायला येऊन जात असून आपआपल्या नेत्यासाठी राज्यसभेची उमेदवारी मागत आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाही. सध्या पक्षात ओबीसी समाजाला संधी द्यावी, अशी मागणी करणारा एक ग्रुप
समीर भुजबळांना संधी मिळण्यासाठी भुजबळांचा दबाव
आहे तर दुसरा ग्रुप अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करत आहे.
राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आपले पुतणे समीर भुजबळ यांना संधी द्यावी यासाठी वरिष्ठांवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. राज्यातील ओबीसी समाजात सरकारबाबत असलेला रोष पाहता तो शांत करण्यासाठी ओबीसी प्रतिनिधी दिल्यास फायदा होईल, अशी भुजबळांची भुमिका आहे.
पार्थ पवार यांच्या नावाचीही चर्चा
सध्या पक्षात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना संधी
मिळावी असा देखील एक मतप्रवाह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार
पार्थ पवार यांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र
पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास सर्व पदे एकाच कुटुंबात अशी
चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडं सुनील
तटकरे यांना संधी दिल्यास त्यांना पक्षाचं काम करता येईल,
असाही एक मतप्रवाह आहे.