गडब / सुरेश म्हात्रे
वडखळ पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची अलिबाग येथे अचल बांगडी करण्यात आली आहे याबाबत चे लेखी आदेश रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे . पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे यापुर्वी नागोठणे पोलीस ठाण्यात कार्यरत होते मात्रत्या ठिकाणीही या अधिकाऱ्याची मनमानी चालत होती पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे वडखळ पोलीस ठाण्यात आल्यापासून कर्तव्यात कसुर करणे, अधिकाराचा गैरवापर करून नागरीकांना दमदाटी करून, आरेरावी , उर्मट भाषा , वापरून अशा अनेक तक्रारी येत असत मात्र वरिष्ठानी त्याची तक्रार घेतली नव्हती .
वडखळ पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती झाल्या नेतर तात्कालीन पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अख्तारीत विशेष शाखेमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे . तानाजी नारनवर हे अवैध धंदेवाल्यांकडून पैसे उकलने, वडखळ परिसरात सुरु असणारे भंगार व्यवसाईक, गावाठी दारू पिक्रेते व अन्य लोकांकडून ते पैसे उकलीत असत. त्यांनी या परिसरात भरपूर माया जमवली आहे. त्यांची बदली झाल्याने या परिसरातील लोकांनी आनंद उत्सव साजरा केला आहे.