गडब/सुरेश म्हात्रे
रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्रांपैकी प्रमुख वृत्तपत्र असलेल्या लोकप्रिय दैनिक पुढारी च्या रायगड जिल्हा आवृत्तीच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक पुढारी विशेष यंग इंडिया अंतर्गत 'सन्मान कर्तृत्वाचा' "युथ आयकॉन" म्हणून नवदुर्गा व सरपंच सन्मान या सन्मान कर्तृत्वाचा याअंतर्गत विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड
यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तसेच ते ग्रामपंचायत
सदस्य असताना केलेल्या कार्याची दखल घेऊन व आता
विद्यमान किहीम ग्रामपंचायत सरपंच म्हणून करत
असलेल्या विकासकामांची दखल घेत दैनिक पुढारी यांनी
आदर्श सरपंच म्हणून किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच
प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचे व ग्रामपंचायत सदस्या
कल्पिता आमले, नेहा सुरेंद्र आर्ते, नूतन प्रसन्न थळे, निधी
निनाद काठे, जान्हवी जितेंद्र वाघे आणि ग्रामसेवक यांचा
महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे,
यांच्याहस्ते व झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा व माजी राजिप
अर्थ व बांधकाम सभापती चित्राताई पाटील, रायगड
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रायगड जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रदीप सरनाईक यांच्यासह दैनिक
पुढारीचे संपादक, उपसंपादक, रायगड जिल्ह्यातील सर्व
प्रतिनिधी, गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी
करणारे सरपंच, विविध सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणारे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, कोरोना
काळातील सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक
यांच्यासह अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत सन्मान
करण्यात आला, यावेळी वरील सर्व मान्यवर मोठ्या
संख्येने उपस्थित होते.