गडब/सुरेश म्हात्रे
पेट्रोल पंप वरील कामगारांबरोबर संगनमत करुन बस मध्ये कमी किंमतीचे डिझेल टाकून जास्त किमतीच्या पावती घेऊन खाजगी कंपनीची 97 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी दोघां विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, आरोपी राकेश माचिवले ( रा. तांबडी, ता. रोहा), व दत्ता भिलारे, (रा. भुवनेश्वर, ता. रोहा ) यांनी 12 सप्टेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत संगनमत करुन वडखळ व सुधागड येथील पेट्रोल पंप मध्ये ड्राइव्ह ट्रॅक कार्ड द्वारे रक्कम अदा करुन आयशर गाडी मध्ये जास्ती चे डिझेल टाकल्याचे भासवून त्याच्या पावत्या सादर न करता ड्राइव्ह ट्रॅक कार्ड द्वारे 97 हजार 500 रुपयांचा अपहार केला. या बाबत रणजित सोंडकर (रा. दमखाडी, ता. रोहा) यांनी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशना खाली पोलीस हवालदार डी. आर. शिंदे अधिक तपास करत
आहेत.