Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

४८ जागा निवडून आणूमविआच्या पहिल्याच बैठकीत निर्धार

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की शिवसेनेची, सगळ्या जागा निवडून आणू असा निर्धार गुरुवारी पार पडलेल्या मविआच्या पहिल्याच बैठकीत झाल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी मविआची पहिली बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्व 48 जागा निवडून आणू, असा निर्धार व्यक्त केला. राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून यापुढच्या 30 तारखेच्या बैठकीला असतील. गुरुवारच्या बैठकीत नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड बैठकीली उपस्थित होते.
३० जानेवारीला जागा वाटप निश्चित
काही लोकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र आम्ही 30 जानेवारीला पुन्हा बसू, आमची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना अधिकृत आमंत्रण दिले आहे. सर्वच प्रमुखांशी त्यांची चर्चा झाली आहे आणि दिल्लीतील नेत्यांशी देखील चर्चा झाली आहे. राजू शेट्टींशीदेखील चर्चा झाली आहे, 30 तारखेपर्यंत जागेसंदर्भात निश्चिती येईल. फॉर्म्युल्यावर जाऊ नका, आम्ही एकत्रित निवडणूक लढणार आहोत. आमच्यात सर्व आलबेल आहे. सर्वच घटक पक्षांशी चर्चा होईल, असे राऊत यांनी सांगितले.