गडब / सुरेश म्हात्रे
ग्रुप ग्राम पंचायत गडब च्या सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील यांच्या हस्ते ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न झाला . या वेळी मान्यवरांच्या हस्ते गडब गावातील अतिथींचा सत्कार करण्यात आला .
यावेळी उपसरपंच सौ. संध्या संतोष म्हात्रे ग्रामसेविका सौ . राजश्री धनावडे, ग्रा पं सदस्य व सदस्या यांच्या सह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी १५ ऑगस्ट या दिवशी जन्मलेल्या मुलींच्या पालकांचा यथोचित गौरव करण्यात आला . व त्या मुलींच्या नावे बँकेत पाच हजाराची एफडी ग्रामपंचायत कारव तर्फे देण्यात आली .