गडब/सुरेश म्हात्रे
पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यावर माती भराव प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री पोर्टलवर दाद मागितली आहे. कथीत भ्रष्टाचार प्रकरणी तहसीलदारांवर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी रोजी पेण तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा पेण येथील तक्रारदार मयूर देवस्थळे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री पोर्टलवर केलेल्या अर्जामध्ये तक्रारदार मयूर देवस्थळे यांनी पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्यावर माती भराव प्रकरणात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत तहसीलदारांनी शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याची तक्रार केली आहे. मयूर देवस्थान यांनी मुख्यमंत्री पोर्टल वर पुढील प्रमाणे तक्रार केली आहे. पेण येथील सर्वे नंबर क्षेत्र २६१/१ क्षेत्र १.२०.७० हे. आर या मिळकतीत कीर्ती कुमार बाफना यांनी शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ३१५९ ब्रास भराव केला.जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश
या विनापरवाना भरावाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर
२ फेब्रुवारी २०२२ रोजी पेण तलाठी यांनी जागेवर जाऊन पंचनामा करून तहसीलदार
स्वप्नाली डोईफोडे यांच्याकडे ३१५९ ब्रास अनधिकृत मातीच्या भरावाचा पंचनामा व
अहवाल सादर केला होता. परंतु कीर्तीकुमार बाफना व पेण तहसीलदार यांच्यामध्ये
आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप देवस्थळे यांनी केला. शासनाने या प्रकरणाची वरिष्ठ
अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर लाच लुचपत
विभागाकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी देवस्थळे यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे शहरात कुळ कायदा लागू नसताना कुळाची कायदेशीर नोंदी करणे,
आदिवासींच्या जमिनीवरील आदिवासींची नावे कमी करून त्या जमिनींचे खरेदी
व्यवहार स्वतःच्या नातेवाईकांबरोबर करणे अशा प्रकारचे आरोप देवस्थळे यांनी या
तक्रारीत केले आहेत.
कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा याप्रकरणी मेलवर तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवण्याकरिता तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच तक्रारदाराला आत्महत्ये पासून परावृत्त करण्याकरिता तहसीलदार व डीवायएसपी यांना सुचीत केले आहे. प्रवीण पवार- प्रांताधिकारी