Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

राष्टवादी काँग्रेस पेण तालुका सचिव मनोज म्हात्रे यांच्या पुढाकाराने गडब खारघाट गावठाण अंतर्गत रोडकडे जाणाऱ्या रस्त्या चे काँक्रीटीकरन पुर्ण

Responsive Ad Here


✍🏼गडब / अवंतिका म्हात्रे

             राष्टवादी काँग्रेसचे तरूण तडपदार आ . अनिकेत भाई यांच्या हस्ते संपुर्ण कासू विभागात भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला . त्यात गडब येथिल खारघाट गावठाण अंतर्गत रोडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण भुमीपुजन नुकताच संपन्न झाले होते . या कार्यक्रमासाठी मनोज म्हात्रे राष्टवादी काँग्रेस पेण तालुका युवक सचिव यांनी मोलाचे सहकार्य केले .
          गावातील तडफदार नेतृत्व असलेले मनोज म्हात्रे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्या मुळे गावातील महिला वर्ग व जेष्ठ नागरोकांना आपल्या घरी चिखलातून जावे लागत होते . ती समस्या त्यांनी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या कडे मांडून तिचा पाठपुरावा करत त्यांनी गावठाण रस्त्या चे काम हाती घेऊन ते काँक्रीटीकरणाचे काम वेळेत पुर्ण केले . त्याबद्दल गावातील महीला वर्ग व जेष्ठ नागरीक यांनी त्याचे काम खुप कौतुकास्पद असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगीतले तसेच असा तडफदार कार्यकर्ता आमच्या गावाला लाभल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले .
  सदर काम पुर्ण करण्यासाठी त्यांना गावातील मित्र परिवार व 
     
       ग्रामस्थ मंडळी खारघाट किशोर पाटील, सुधीर पाटील,सुनील पाटील, गुरुनाथ पाटील, प्रकाश बांधनकर, पांडूरंग पाटील ,सागर पाटील , देवीदास पाटील, निलेश पाटील , सुजित कोठेकर शुभम पाटील . गजानन पाटील जनार्दन पाटील नम्रता म्हात्रे . व महिला मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले .